एमआयटी एडीटी विद्यापीठाचा इनक्युबेटर प्रमोदला बीआयआरएसीकडून डिझाईनसाठी 50 लाखाचे अनुदान

Share this Newz

पुणे :  एमआयटी आर्ट्स, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या अटल इनक्यूबेशन सेंटरचा (एआयसी) इनक्युबेटर प्रमोद प्रिया रंजन याला बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन कौन्सिलने (बीआयआरएसी) मासिक पाळीच्या नाविन्यपूर्ण कप डिझाइनसाठी 50 लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. भारतात असा प्रकारचे डिझाइन करण्यात येणार हे पहिले उत्पादन असेल.
‘बीआयजी’ (बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रांट) योजनेची 16 वी सभा जानेवारी 2020 आयोजित करण्यात आली होती. यात युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि नीती आयोग यांच्या सहकार्यांने युथ-को लॅब च्या राष्ट्रीय इनोव्हेटिव्ह चॅलेंज 2020 स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनेक संशोधकांनी आपले संशोधन सादर केले होते. याचा 23 ऑगस्ट 2020 रोजी निकाल जाहीर झाला. यात एमआयटी एडीटीच्या प्रमोद प्रिया रंजन याच्या डिझाईनला 50 लाख रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले.
इनक्युबेटर प्रमोद प्रिया रंजन म्हणाला, एमआयटी इंस्टीट्युट ऑफ डिझाईनचे प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर यांच्यासह रांची (झारखंड) येथे केअर फॉर्म लॅबज प्रा. लि. नावाचे स्टार्टअप आम्ही सुरुवात केली आहे. हा अनुदान कंपनीला मासिक पाळीसंदर्भातील नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या विकासासाठी देण्यात आला आहे. यावर माझी टीम आणि मी गेल्या एक वर्षापासून काम करत आहोत. सध्या डिझाईन संदर्भात योग्य प्रमाणात काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आम्हाला 30 लाख रुपयाची आवश्यकता भासणार आहे.
एमआयटी एआयसीचे सीईओ डॉ. मोहित दुबे म्हणाले, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि नीती आयोग यांच्या सहकार्यांने युथ-को लॅब च्या राष्ट्रीय इनोव्हेटिव्ह चॅलेंज 2020 स्पर्धेत देशभारतील सर्वात्मक 14 स्टार्ट ॲपनी सहभाग घेतला होता. यातून एमआयटी एआयसीच्या स्टार्ट ॲपची निवड करण्यात आली. या डिझाईनसाठी रंजन यांच्यासोबत एमआयटी डिझाईन सेंटरचे संचालक डॉ. धीमंत पांचाळ, एमआयटी आयडीच्या ट्रान्सपोर्टेशन डिझाईनचे प्रमुख डॉ. नचिकेत ठाकूर आणि एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगच्या प्रिन्सिपल रेणू व्यास, के परीख आणि श्रेया येनगुल यांनी काम पाहिले आहे. या उत्पादनाचे काही नमुने तयार करण्यात आले आहेत. लवकरच या उत्पादनाचे लॉन्चिंग करण्यात येईल.
इनक्युबेटर प्रमोद प्रिया रंजन आणि त्याच्या टीमला मिळालेल्या या अनुदानाबद्दल आणि यशाबद्दल एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एआयसी-एमआयटी एडीटी विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मोहित दुबे, संचालक डॉ. राहुल मोरे यांनी अभिनंदन केले.


Share this Newz