सांगवी : आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. स्वच्छ्ता हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन आपले घर, परीसर स्वच्छ ठेवला पाहिजे तरच आपले आरोग्य चांगले राहील, असे प्रतिपादन मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी केले.
जुनी सांगवीतील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. सौ शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशुविहार, नूतन माध्यमिक विद्यालय, व सुंदरबाई भानसिंग हुजा गुरू गोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यावतीने आयोजीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमीत्त स्वच्छता अभियान कार्यक्रमात माने बोलत होते.
शिवाजीराव माने म्हणाले, की महात्मा गांधींनी आपल्याला स्वच्छतेचा मंत्र दिला. लालबहादुर शास्त्री यांनी देशाचे रक्षण करायचे असेल तर जवान आणि किसान यांना आपण जपलं पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्याना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. प्रत्येक भारतीय नागरिकाने परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी असे ते म्हणाले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या परिसराची व स्वच्छता गृहाची स्वच्छ्ता केली. यावेळी शाळेचे स्वछता कर्मचारी सुंदर राजोडिया व मंजुताई राजोडिया यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या अभियानात सर्व माध्यमाच्या एकुण 900 विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक दत्तात्रय जगताप यांनी, तर आभार सप्निल कदम यांनी मानले.












Leave a Review