दुर्गामाता दौडचे सांगवी परिसरात उत्स्फूर्त स्वागत

Share this Newz

पिंपरी, प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे दुर्गामाता दौडचे सांगवी, पिंपळे गुरव परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी नवी सांगवी विभाग सुरवात करणारे निशिकांत वानखडे, सुशांत पोतदार, साई कोढंरे, सचिन बंडगर, अजिंक्य बोरडे, स्वप्नील सावंत, अमोल सुतार, प्रशांत ढोबळे, शुभम गावडे, भागवत भांडे, ओमकार भिर्वे, ओम देशमुख, प्रतीक भोसले आदी उपस्थित होते.

२०२० साली लावलेले छोटेसे रोपटे आज बहरत आहे. मोठया वटवृक्षात रूपांतर होत आहे. दुर्गामाता दौड का ? कशासाठी ? त्याच महत्व काय ? असे अनेक प्रश्न पडतात.

आज पाहायला गेलं तर आपला सगळं देश जाती – पातीमध्ये गुरफटला गेला आहे. आपला समाज आणि तरुण पिढी एका खोल अंधारात लोटली गेली आहे. नवपिढी विस्कळीत होऊन चुकीच्या मार्गाला लागली आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी ही दुर्गामाता दौड चालू केली. यामुळे नवपिढी एकत्र जमू लागली. अठरापगड जाती एकत्र येऊन तरुणांना योग्य ती दिशा मिळू लागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माचे मावळे एकत्र करून हिंदवी स्वराज्य उभे केले. याची प्रेरणा आजच्या तरुण पिढीने घ्यावी, हा यामागे उद्देश आहे.


Share this Newz