पिंपरी चिंचवडमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपचे घंटानाद आंदोलन

Share this Newz

पिंपरी-चिंचवड : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पक्षपाती व मनमानी कारभाराच्या विरोधात तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शनिवारी निगडी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, आप नेते सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष चंद्रमणी जावळे, युवक अध्यक्ष विकी पासोटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अॅड. सुप्रिया गायकवाड, सुरेश बावनकर, आप नेत्या कविता कोंडे देशमुख, सुनंदा दुधाळ, यशवंत कांबळे, लक्ष्मण माने, राहुल मदने, मोहम्मद मोसीन, सिमा बावनकर, युवक उपाध्यक्ष शिवकुमार बनसोडे, युवक महासचिव अंकुश डोंगरे, युवक सचिव राजकुमार अडोळे, युवक सचिव गौतम अडसूळ, युवक सदस्य सोनू हिंगे, युवक सदस्य गौतम तायडे, युवक सदस्य सुरज झिटे, आदिनाथ जावीर, सिद्धार्थ पगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनादरम्यान “घंटा वाजवा, देश जागवा!”, “SIR रद्द करा” आणि “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा द्या!” अशा घोषणा देत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, स्वतंत्र आणि विश्वासार्ह असावी, अशी मागणी केली. नागरिकांच्या मतदानाच्या मूलभूत लोकशाही अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्या कडून SIR रद्द करणे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणे आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करणे, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी आपला संघर्ष पुढेही सुरू ठेवणार असल्याचे वैजनाथ शिरसाट यांनी सांगितले.


Share this Newz