Airtel thanks : एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी एअरटेल थँक्स अॅप आता मराठीत उपलब्ध 

Share this Newz

मुंबई :  भारती एअरटेल (Airtel)च्या वतीने त्यांच्या प्रीपेड ग्राहकांकरिता एअरटेल थँक्स अॅपवर मराठी भाषा साह्य उपलब्ध करून देण्याविषयीची घोषणा करण्यात आली. हे वैशिष्ट्य अॅन्ड्रॉईडवर लाइव्ह उपलब्ध होणार असून, लवकरच आयओएसवर उपलब्ध होऊ शकेल.

स्मार्टफोनचा वापर हा प्रामुख्याने छोट्या शहरांत आणि गावांमध्ये वाढलेला दिसतो. त्यामुळे ग्राहकांना स्थानिक भाषांमध्ये ऑनलाइन अनुभवाची आवश्यकता भासते. एअरटेल थँक्स अॅपवरील या नवीन वैशिष्ट्याला अधिकाधिक पसंती मिळणार आहे. त्याचप्रमाणे वापरकर्त्याचा अनुभव सुलभ होण्यास मदत मिळेल. भाषाविषयक अडथळे काढून टाकल्याने हे अॅप अतिशय संवादात्मक ठरले आहे.

एअरटेल थँक्स अॅप हा सर्व एअरटेल सेवांकरिता असलेला डिजीटल पर्याय आहे. तो कस्टमाईज्ड इंटरफेस जसे की, सिल्वर, गोल्ड, प्लॅटीनम अशा ग्राहक आधारीत एआरपीयुसोबत येतो.  हे अॅपएअरटेल स्मार्टफोन ग्राहकांना डिजीटल सेल्फ केअर एक्सेस उपलब्ध करून देते. ज्याद्वारे रिचार्ज करणे, देयक भरणा, सुनिश्चित वेळेत डेटा वापर/ शेष रक्कम इत्यादी तपास करणे शक्य होते. या अॅपवर काही क्लिक करताच सेवा संबंधित समस्यांची नोंद घेऊ शकतात. या अॅपद्वारे एअरटेलच्या डिजीटल एंटरटेनमेंट लायब्ररीचा लाभ घेता येतो. सोबतच डिजीटल पेमेंट आणि आर्थिक सेवांची सुविधा मिळते.

एअरटेलचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर आदर्श नायर म्हणतात की: “एअरटेलमध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या साह्याने ग्राहकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना चांगला अनुभव देण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. एक स्मार्टफोन राष्ट्र म्हणून भारताचे परिवर्तन होत आहे. जवळपास 35% एअरटेल थँक्स अॅप हे आता टियर 2/3 शहरे आणि ग्रामीण बाजारपेठेशी निगडीत आहेत. सखोल भाषिक साह्य मिळाल्याने आता एअरटेल थँक्स अॅप हे त्याच्या ग्राहकांच्या दृष्टीने अधिक समर्पक ठरले आहे. त्याचप्रमाणे त्याची उपलब्धतता वाढली. ज्यामुळे ग्राहक वर्ग एअरटेलच्या आकर्षक डिजीटल सेवांचा लाभ संपूर्ण क्षमतेने घेऊ शकतो.”

एअरटेल थँक्स अॅपचे संपूर्ण डिझाईन आणि निर्मिती एअरटेलच्या इन-हाऊस इंजिनिअरिंग टीमद्वारे करण्यात आले आहे.

आता एअरटेल प्रीपेड मोबाईल ग्राहकांकरिता एअरटेल थँक्स अॅपबहुविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे – हिंदी, तेलुगु, बंगाली, मराठी, तमीळ, गुजराती, मल्याळम आणि पंजाबी. आगामी आठवड्यांत कन्नड, आसामी आणि ओडिया भाषा उपलब्ध होईल.


Share this Newz