मुंबई :
भारतातील ‘हॉट अँड फिट’ जोडी म्हणून ओळखली जाणारी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणार्या जोडप्यांपैकी एक आहेत.
चाहत्यांचे मनोरंजन कसे करावे हे या जोडीला बरोबर माहीती आहे. चाहत्यांची ‘विरुष्का’ ही जोडी सध्या लॉकडाउनमध्ये घरातच आहे. पण तरीही चाहत्यांच्या सातत्याने संपर्कात कसे राहायचे याची कला दोघांनाही चांगलीच अवगत आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणार्या अनुष्काने इन्स्टाग्रामवर आज एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराटने एकमेकांची मुलाखत घेतली.महत्त्वाचे म्हणजे यात विराटला बॉलिवूड संबंधित प्रश्न विचारण्यात आले. तर अनुष्काला क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले.
त्यातले काही प्रश्न म्हणजे
कोहली – कोणत्या मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हणतात?
अनुष्का – लॉर्ड्स
अनुष्काने कोहलीला बॉलिवूडशी संबंधित काही प्रश्न विचारले.
अनुष्का – पहिल्या हिंदी फीचर चित्रपटाचे नाव काय?
कोहली – मला माहित नाही
अनुष्का – (अखेर तिनेच उत्तर दिलं) राजा हरिश्चंद्र
या मुलाखतीला मात्र सोशल मिडीयावर जोरदार लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेक चाहते हा व्हिडीओ पाहून घरात या दोघांची नक्कल करत आहेत.









Leave a Review