आता धोनीला आयपीएलमध्ये बघण्यास चाहते उत्सुक

Share this Newz

मुंबई :

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल त्याचे कौतुक केले आहे. तर भारतरत्न सचिन तेंडूलकर, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी धोनीला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करत आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात युएईमध्ये खेळवल्या जाणार्‍या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपर किंग्जमधील सहकार्‍यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. 20 ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.

१५ ऑगस्टला संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत निवृत्ती जाहीर केली. तब्बल 16 वर्ष धोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. एका विशेष मुलाखतीत रवी शास्त्री यांनी धोनी हा भारतीय क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक मानला जाईल असे म्हटले आहे.

धोनी हा प्रचंड चपळ आहे. रांची सारख्या ठिकाणावरुन भारतीय संघात स्थान मिळलवलेल्या धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने कसोटी, एक दिवसाचे सामने आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारात आपली जादू दाखवली. टी-20 विश्वचषक, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी, एकदिवसाच्या सामन्यांचा विश्वचषक हे सगळे धोनीमुळे शक्य झाले. या संपूर्ण प्रवासात तो नेहमी शांत होता. जी गोष्ट त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदाबद्दल तीच त्याच्या यष्टीरक्षणाबद्दल त्याच्या यष्टीरक्षणाच्या शैलीमध्ये तंत्र नव्हते.पण त्याचा वावर हा प्रभावशाली होता. यष्टीरक्षक म्हणून तुम्ही त्याचा भारतीय संघावरचा प्रभाव पाहा, तुम्हाला कल्पना येईल. स्टम्पिंग किंवा रन आऊट करताना तो ज्या पद्धतीने हालचाल करायचा हे पाहण्यासारखे असायचे. समोरच्या फलंदाजाला धोनीने मला बाद केले हे समजायचे नाही. धोनी महान खेळाडू होण्यामागे या गोष्टी कारणीभूत आहेत.


धोनीपाठोपाठ निवृत्त झालेल्या रैनाचे बायकोने केले कौतुक

कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला संध्याकाळी निवृत्तीची घोषणा करत सर्वांना धक्का दिला. धोनीच्या निवृत्तीची बातमीने मिळालेल्या धक्क्यातून चाहते सावरतात न सावरतात तोच त्याचा सहकारी सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. सगळीकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु असताना भारतीय संघासाठी सुरेश रैनाचे योगदानही विसरता येणार नाही. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करणारा भरवशाचा फलंदाज, फिरकीपटू आणि उत्तम क्षेत्ररक्षक अशी तिहेरी भूमिका रैनाने भारतीय संघात निभावली. सध्या रैना धोनीसोबत चेन्नईत आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी करत आहे.

काही दिवसांपूर्वीच रैना दुसर्‍यांदा बाबा झाला. रैनाची पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रैनाच्या निवृत्तीची बातमी समजल्यानंतर पत्नी प्रियांकानेही ट्विटरवर त्याचे अभिनंदन करत मला तुझा अभिमान असल्याचे म्हटले आहे. रैनाची बायको म्हणाली की आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रैनाने अनेक महत्वाचे विक्रम केले. कसोटी, वन-डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारात शतकं झळकावणारा रैना हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नसलं तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये तो खेळत होता. भारतीय संघात रैना आणि धोनीचा याराना हा परिचीत आहे. त्यामुळे आपल्या मित्रापाठोपाठ निवृत्ती स्विकारणे रैनाने पसंत केले.

क्रिकेटसाठी तुम्ही दिलेले योगदान सर्वोत्तम : कैनत

धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. निवृत्तीसाठी धोनीने 15 ऑगस्ट आणि संध्याकाळी सात वाजून 29 मिनीटांचीच वेळ का निवडली यावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार्‍या महेंद्रसिंह धोनीवर सध्या सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संघातले त्याचे सहकारी, राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रेटी त्याला आगामी भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू कैनत इम्तियाजनेही धोनीला निवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीला आणि योगदानाला सलाम. क्रिकेटसाठी तुम्ही दिलेले योगदान सर्वोत्तम आहे. अशा शब्दांत कैनतने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालाधीत आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत रंगणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी धोनीने चेन्नईचे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनीवासन यांच्याशी चर्चा केल्याचे समजत आहे. चेन्नईकडून पुढचे काही हंगाम खेळत राहणार असल्याचे धोनीने सांगितले असून भविष्यातही संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला धोनीला आवडणार आहे.

तुझ्यासोबत खेळायला मिळाले हेच माझे भाग्य : केदार जाधव

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार्‍या धोनीने सर्व चाहत्यांना धक्का दिला. आपल्या कारकिर्दीत धोनीने अनेक खेळाडूंना संधी दिल्या. महाराष्ट्राचा खेळाडू केदार जाधव हा देखील त्यापैकी एक.पुण्यातून प्रतिक्रिया देताना केदार जाधवही भावूक झाला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक संदेश लिहीत त्याने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. तुझ्यासोबत जेवढा वेळ घालवला त्यामधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना तुझ्यामुळे प्रेरणा मिळाली तुझ्यासारखा मोठा भाऊ, मार्गदर्शक लाभणे हे मी माझे भाग्य समजतो.

‘मैं पल दो पल का शायर हूँ..’ : धोनी

एम. एस. धोनीने आपल्या आवडत्या खेळाला निरोप देतानाही त्याच्यातील वेगळेपणाची झलक दाखवली. ‘मै पल दो पल का शायर हूँ..’ या गाण्यावर आपल्या क्रिकेट कालखंडातील महत्त्वाच्या क्षणांचा वेध घेणारी ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर टाकत धोनीने 15 ऑगस्टच्या सायंकाळी सात वाजून 29 मिनिटांनी कारकीर्दीपुढे पूर्णविराम दिला. ‘‘माझ्या संपूर्ण कारकीर्दीतील लाभलेले तुमचे प्रेम आणि पाठींब्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. मी निवृत्त असेन अशी पोस्ट ‘इन्स्टाग्राम’वर टाकली.

आयपीएलमध्ये आम्ही पुन्हा भेटणार : रोहित शर्मा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार्‍या महेंद्रसिंह धोनीवर सध्या सर्व बाजूंनी त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संघातले त्याचे सहकारी, राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रेटी त्याला त्याच्या दुसर्‍या इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत. सध्याचा भारतीय संघाचा उप-कर्णधार आणि मुळचा मुंबईकर खेळाडू रोहित शर्मानेही निवृत्तीनिमीत्त धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.सध्या धोनी आणि रोहित शर्मा आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करत आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. भारतीय क्रिकेटमधला सर्वात प्रभावशाली व्यक्ती भारतीय संघात आम्हाला त्याची उणीव नेहमी भासत राहिल. 19 तारखेला नाणेफेकीदरम्यान भेटू अशा शब्दांत रोहितने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा यशस्वी होण्यामागे धोनीचाही मोठा वाटा आहे. 2013 साली इंग्लंडविरुद्ध मोहालीतील एकदिवसाच्या सामन्यात धोनीनेच रोहितला सलामीला येण्याची संधी दिली. रोहित आणि धोनीमध्ये आयपीएलमध्येही ही स्पर्धा सुरु असते. रोहितने मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्व कौशल्याने 4 विजेतेपदे मिळवून दिली आहेत.


Share this Newz