द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :
वसंत पंचमी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बंगाली समाजातील नागरिकांकडून माता सरस्वतीचे मूर्ती पूजन व होम हवन करण्यात आले. तद्नंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
बंगाली समाजातील नागरिक हे सरस्वती देवीचे नित्य नियमित पूजन करीत असतात. पण वर्षातील दोन दिवस मूर्तीची मनोभावे स्थापना करतात पहिल्या दिवशी देवीच्या मूर्तीचे पूजापाठ होम हवन व दुसऱ्या दिवशी आनंदाने देवीच्या मूर्तीचे विसर्जन करतात.
माता सरस्वती देवी ही ज्ञान देवता असून बंगाली समाजातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या शाळेतील पहिल्या दिवसाची सुरुवात सरस्वती देवी चे पूजन करून शालेय जीवनाची सुरुवात करतात असे त्या प्रसंगी उपस्थित असणारे संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले.
यावेळी कावेरी जगताप यांच्या हस्ते माता सरस्वती देवीचेपूजा करण्यात आली. या प्रसंगी संजय जगताप, संजय मराठे, बच्चू माल, सोमनाथ माल, मिठू माल, श्रावंती माल, झुमा माल, विश्वजीत माझी, संपा माझी, दुर्गा पात्रा, शिप्रा पात्रा, शिप्रा दास, प्रिया माल, पूजा माल, झुंपा आस,पोम्पा बेरा, अपर्णा तुरे, सुबीर पात्रा, पिंटू पात्रा, पलास माल आदी उपस्थित होते.










Leave a Review