The Newz Biz Team, PIMPRI
जुनी सांगवी येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ संत शिरोमणी सावता माळी अभियान शेतकरी ते थेट ग्राहक विक्री या योजनेअंतर्गत येथील शितोळेनगर येथे गुरुवारी आठवडे बाजारास सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते या आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. दर गुरुवारी पश्चिम भागात शितोळेनगर, तर पूर्व भागात प्रियदर्शनीनगर एसटी कॉलनी कॉर्नर वसंतदादा पुतळा चौकात दर रविवारी हा आठवडे बाजार असणार आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सांगितले, की थेट शेतकरी ते ग्राहक भाजीपाला, कडधान्य,फळे, स्वयंपाक घरात लागणा-या इतर खाद्यपदार्थ हे एकाच ठिकाणी ताजे, दर्जेदार व माफक मिळत असल्याने सांगवीकरांचा आठवडे बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेत माफक दरात व ताजी भाजी, फळे मिळत आहेत.
यावेळी कुमार ढोरे, आबासाहेब ढमाले, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, पंकज कांबळे, सुनिल ढोरे, उज्ज्वला ढोरे, प्रकाश ढोरे, रुपेश पुजारी, राधिका घोडके, शेखर शितोळे, गणेश शितोळे, धनंजय शितोळे आदी उपस्थित होते.












Leave a Review