डॉ. पराग संचेती यांच्या हस्ते सेव्हन बिझनेस स्क्वेअरचे उद्घाटन

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

नाईकनवरे डेव्हलपर्सच्या नवीन व्यावसायिक प्रकल्प ७ बिझनेस स्क्वेअरचे उद्घाटन संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व एमडी. डॉ. पराग संचेती यांच्या हस्ते झाले. यावेळी नाईकनावरे डेव्हलपर्सचे संचालक हेमंत नाईकनवरे, मुख्य वास्तुविशारद गौरी नाईकनवरे आणि व्यवसाय प्रक्रिया प्रमुख आनंद नाईकनवरे उपस्थित होते.

सेव्हन बिझिनेस स्क्वेअर हे गणेशखिंड रोड येथील एक व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहे. येथे आॅफिस आणि रिटेल स्पेस उपलब्ध आहेत. या प्रकल्पामध्ये ७ नेत्रदीपक फायदे आहेत. त्यामध्ये ३५ वर्षाचा अनुभव असलेले नाईकनवरे डेव्हलपर्स, शहराचा मध्यवर्ती भाग,  कार्यालयीन सेवा देणाऱ्यांसाठी सुविधा, कृषी महाविद्यालयाचा हरित पट्टा, ग्रीन इमारत प्रमाणपत्र, उत्तम पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी आणि नाविन्यपूर्ण आर्किटेक्चरचा चमत्कार यांचा समावेश आहे.


Share this Newz