प्रियांक शाह यांची राष्ट्रवादीच्या उद्योग व व्यापार सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी प्रियांक शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार सेल पुणे शहर अध्यक्ष भोलासिंग अरोरा यांनी केली.

नियुक्ती नंतर शाह यांनी सांगितले, की महाराष्ट्र कट्टा आणि सेलच्या माध्यमातून व्यापारी वर्गाच्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रियांक शाह हे विविध माध्यमातून सामाजिक कार्य करित आले आहेत. त्यांचे हेच सामाजिक कार्य पाहता ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापुर्वी आपल्या  कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे कामे मार्गी लावली होती. व्यापार्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

खासदार वंदना चव्हाण आणि आमदार चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्‍यांनी या नियुक्तीचे स्वागत केले.


Share this Newz