The Newz Biz Team, Pune
सुशिक्षित बेरोजगार व पदवीधर तरूणांचे भविष्य उज्वल करण्यासाठी गणेश सुखदेव काटकर पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवित आहेत, त्यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन विजयी करा, असे आवाहन ‘आम्ही मराठा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरूध्द शिवाजी शेलार यांनी केले आहे.
अनिरूध्द शेलार यांनी सांगितले, की, काटकर पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवित आहेत. त्यांना पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर पाचही जिल्ह्यात त्यांना पदवीधरांचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काटकर यांचा त्यांचा अनुक्रमांक 20 आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी काटकर यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन ‘आम्ही मराठा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरूध्द शिवाजी शेलार यांनी केले आहे.











Leave a Review