शाळांमध्ये गड किल्ल्यांची माहिती मिळावी, यासाठी विशेष प्रयत्नांची गरज : अरुण पवार

मराठवाडा जनविकास संघातर्फे आयोजित गड किल्ले स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
Share this Newz

The Newz Biz Team, Pune

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने गड किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक सरस्वती अनाथ आश्रम दापोडी , द्वितीय क्रमांक सांगवीतील शिक्षक सोसायटी, तर तृतीय क्रमांक शांताराम बाईत प्रतिष्ठान यांनी मिळविला.

मराठवाडा जनविकास संघामार्फत अध्यक्ष अरूण पवार, रोहीदास बोऱ्हाडे (पोलीस नाईक) यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघांना पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळी गोड होण्यासाठी ब्लँकेट देण्यात आले. सर्व मुलांनी एकत्र फराळाचा आनंद घेतला.

अरुण पवार यांनी मुलांचे कौतुक करीत सांगितले, की सर्व शाळांमध्ये गड किल्ल्यांची माहिती मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गड किल्ल्यांची काळजी कशी घ्यावी, तेथील स्वच्छता, पर्यावरण रक्षण अशा विविध बाबींची माहिती विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शालेय स्तरावर शिक्षकांनी मुलांना गड किल्ल्यांची अधिक माहिती कशी मिळेल, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात हा पारंपरिक वारसा जतन करण्याची प्रेरणा कशी मिळेल. यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहनही अरुण पवार यांनी केले.

यावेळी राम पवार (सहा. पोलीस फौजदार), गणेश धामणकर (पोलीस नाईक), रवींद्र बाईत, ह.भ.प. पुरूषोत्तम वाघमारे, कृष्णाजी खडसे (अध्यक्ष पितामह भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ), देविदास सुरवसे (अध्यक्ष सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम) मान्यवर उपस्थित होते.


Share this Newz