The Newz Biz Team, पुणे
महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक २९ मध्ये सृष्टी चौक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्वच्छता अभियानात नगरसेविका उषा मुंढे, चंदाताई लोखंडे, नगरसेवक सागर आंघोळकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे सहभागी झाले होते.
याप्रसंगी कोरोनाच्या संकट काळात आपले आरोग्य धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनिल देवकर, आरोग्य निरीक्षक शांताराम माने, महापालिकेचे इतर कर्मचारी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.











Leave a Review