The Newz Biz Team, पुणे
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात चंदपा पोलीस स्टेशन हद्दीत चार तरुणांनी मागासवर्गीय मुलीवर बलात्कार करून तिचे हाल केले. या घटनेच्या निषेधार्थ लुंबिनी बुध्द विहार औध कॅम्प यांनी नवी सांगवीतील फेमस चौकात कॅन्डल मार्च (candle march) काढून निषेध (protest) नोंदविण्यात आला. तसेच पीडित मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. या मोर्चात सांगवी- पिंपळे गुरव परिसरातील वाल्मिक समाजाचे कार्यकर्ते, १२५ जयंती महोत्सव पिंपरी-चिंचवड शहर, भिम ज्योत सामाजिक संस्था, आदियाल स्पोर्ट क्लब, रिपब्लिकन पार्टी (एकता वादी) सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला व पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे व संबंधित गुन्हेगारास कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
कित्येक वर्षे महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असून, हे सत्र कधी थांबेल असा सवाल महिला विचारत आहेत. अत्यंत क्रूरपणे या मुलीला मारण्यात आले. मुलीच्या मृत्युनंतर मृतदेह कुटुंबाला न देता पोलिसांनीच या मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने युपी सरकार आरोपींच्या पाठीशी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांनी केला. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या कॅन्डल मार्चमध्ये अमरसिंग आदियाल, बाळासाहेब पिलेवार, मोहन कांबळे, नाना धेंडे, शाम खोडगे, राजबाबू सकैनिरया, राजू बेद, लाल बिगी, अॅड. राजेश नितनवरे, संदिप नितनवरे, नयन अहिरे, महेश माने, साहेबराव तुपे, महाविर कांबळे, राम घोडके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.










Leave a Review