प्रांत पोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय भोई समाज व सातारा मित्र मंडळातर्फे पोलिसांना आयुर्वेदिक काढ्याचे वाटप

Share this Newz

The Newz Biz Team, पुणे

पोलिस बांधवांची कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सामाजिक संघटनांचा आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आला. सांगवी पोलीस स्टेशन येथे प्रांत पोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय भोई समाज सांगवी विभाग आणि सातारा मित्र मंडळ सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता बंदोबस्त देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल व इतर औषधी वनस्पती असलेल्या काढ्याचे मोफत वाटप करण्यात आले.

ही औषधे पोलीस बांधवांची रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याबरोबरच मधुमेह व रक्तदाब यासारख्या दुर्धर आजारांवर अत्यंत उपयुक्त आहेत. सध्या कोरोनाच्या कालावधीमध्ये पोलिसांचा अतिरिक्त कामाचा ताण तसेच शारीरिक समस्या लक्षात घेता एका सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वरील संस्थांनी या आयुर्वेदिक औषधाचे मोफत वाटप केले.

या कार्यक्रमाअंतर्गत पोलीस प्रशासन व सर्वसाधारण नागरिकांना मदत करणाऱ्या पोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोना योद्धा या सन्मानाने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय भोसले, टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक आशिष कदम, प्रांत पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष गोपाळ बिरारी, मध्यवर्ती शांतता कमिटी सदस्य सुभाष मालुसरे, एलआयबीचे राऊत, सातारा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, उपाध्यक्ष संजय चव्हाण, खजिनदार सोमनाथ कोरे, विजय शिंदे, विक्रम पाटील, राजेंद्र कुवर, दत्ता अवसरकर, अशोक शिंदे, दत्तात्रय देवकर, नितीन ढमनगे, राष्ट्रीय भोई समाजाचे अध्यक्ष नितिन कारळे, कार्याध्यक्ष विजय भिकन तारू, खजिनदार विनायक बबनराव काराळे, सचिव योगेश घुमे, संघटनमंत्री रघुनाथ मुसळे, सदस्य तेजस बारंगळे प्रांत पोलीस मित्र संघ सातारा मित्र मंडळ सांगवी व राष्ट्रीय भोई समाजाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Share this Newz