महाराष्ट्राची चटपटीत बालाजी भेळ आता सांगवीत

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

अल्पावधीतच खवैय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारी व चव, स्वच्छता तसेच सेवा यामुळे खवैय्यांच्या पसंतीस उतरलेली चटपटीत बालाजी भेळ आता नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात दाखल झाली आहे.

भेळीचे विविध प्रकार, चाट, विविध प्रकारचे फरसान, सकाळचा स्वादिष्ट नाष्टाही इथे मिळणार आहे. स्वच्छता, चव व सेवा या निकषावर नक्कीच ग्राहकांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास अनेक ग्राहकांनी व्यक्त केला आहे. बालाजी भेल चाट सेंटर नवी सांगवीतील कृष्णा चौक येथील शॉपमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी अनेक बॅनरवर जागृतीपर मेसेज लिहल्याने सर्वानी कौतुक केले.

कृष्णा चौकातील या भेळ सेंटरचे उद्धाटन प्रकाश पाटील व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सूर्यकांत गोफणे, छोटोलाल गुप्ता, बालाजी भेल चाट सेंटर नवी सांगवीचे मालक मनोजकुमार मारकड, बाबासाहेब चितळकर, अजय दूधभाते, सतिश कोकरे, संतोष मदने, विमलकुमार गुप्ता, सुनिल गुप्ता, सुरज गोटके, ओंकार पाटील, सचिन सरक, छडी कुमार, विलास पाटील देवकाते, मोहित पांडेय, विनय विष्वकर्मा, सुधाकर सुर्यवंशी, डॉ दिनेश पडळकर, अनुराग, रूपेश पांड्ये आदी मान्यवर उपस्थित होते.


Share this Newz