बालेवाडीत माय सह्याद्री डेअरीचे उद्घाटन

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

“शुद्धतेसह समृद्धीकडे” हे ब्रीद डोळ्यासमोर ठेऊन शेकडो ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या बारामती येथील माय सह्याद्री डेअरीची दहावी शाखा बालेवाडी येथे नुकतीच सुरू करण्यात आली.

बालेवाडी येथील ब्राव्हेरिया सोसायटी समोर सुरू झालेल्या या डेअरी शॉपीचे उद्घाटन पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी नगरसेविका स्वप्नाली सायकर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रविंद्र घाटे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, नगरसेविका माधवी राजापुरे, माय सह्याद्री दुग्ध प्रक्रिया उद्योग समुहाचे संचालक सचिन घाडगे, सरपंच उज्ज्वला आगळे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे, रविंद्र विधाटे आदी उपस्थित होते.

गजानन विधाटे व ऋषीकेश शिंदे या युवकांनी सुरू केलेल्या दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीच्या या व्यवसायास सर्व मान्यवरांनी शुभेच्या दिल्या. या डेअरीच्या माध्यमातून परिसरातील ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचे युवा व्यावसायिक गजानन विधाटे व ऋषीकेश शिंदे यांनी सांगितले.


Share this Newz