The Newz Biz Team, Pune
एलपीजी गॅस, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज म्हणजेच एक ऑक्टोबरपासून केंद्र सरकारकडून नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. याचा थेट परिणाम जनसामान्यांवर होणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) माध्यमातून देण्यात येणारी मोफत एलपीजी (Free LPG) गॅस कनेक्शन ही सेवा आजपासून बंद झाली आहे. मिठाई दुकानदारांना वैधता संपलेली (Expiry Date) मिठाई विकता येणार नाही. वाहन चालवण्याचा परवाना (Driving License ) आणि केडिट कार्ड (Credit Card) आदींबातही काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जे आजपासून लागू होत आहेत.
फ्री एलपीजी कनेक्शन शेवटचा दिवस
प्रधानमंत्री उज्जवला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY) योजनेचा लाभ घेण्या(३० सप्टेंबर) साठी काल शेवटचा दिवस होता. या योजनेंतर्गत मिळणारे फ्री एलपीजी गॅस कनेक्शन आजपासू बंद झाले आहे.
वाहन चालवताना मोबाईल वापरास सवलत
केंद्र सरकारने वाहतूक नियमामत महत्त्वपूर्ण बदल करत वाहन चालवताना नियम व अटींचे पालन करुन मोबाईल वापरास परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार वाहन चालवताना नेविगेशन म्हणजेच रस्ता पाहण्यासाठी (दिशा, मार्ग) मोबाईलचा वापर करता येणार आहे. मात्र, मोबाईल वापरताना चालकाला वाहनावरील ताबा सुटणार नाही, याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. दरम्यान, वाहन चालवताना फोनवर बोलण्यास मात्र परवानगी नाही. वाहन चालवताना चालक जर मोबाईलवर बोलताना आढळला तर १ ते ५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचे प्रावधान या नियमांमध्ये आहे.
Expired मिठाई विकण्यास बंदी
मिठाई विक्रेत्यांना यापुढे मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायरी डेट संपलेली मिठाई विक्री करता येणार नाही. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार एक्सापायरी डेट संपलेली मिठाई विकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा नियम एक ऑक्टोबरपासून लागू असणार आहे. एफएसएसएआईने संबंधित नियमांचे पालन करण्याबाबत देशभरातील सर्व राज्यांना एक पत्रही लिहिण्यात आले आहे.
Credit card New Rules
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्य याबाबत आजपासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार यापुढे क्रेडिट कार्डचा वापर केवळ PoS (Point of Sale) पेमेंट करताना किंवा एटीएममधून पैसे काढतानाच करता येणार आहे. हा नवा बदल सर्व कार्ड्स, नवे कार्ड्स किंवा रिन्यू केलेल्या कार्ड्सनाही लागू असणार आहे. ऑनलाईन, कॉन्टेक्टलेस किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहारांसठी जर कार्ड्सचा वापर करत असाल, तर त्यासाठी या सेवा आपल्याला मॅन्युअली सुरु कराव्या लागतील. या सेवा वापरण्यासाठी आपण नेटबँकिंग सुरु करु शकता. त्याशिवाय ATM किंवा ब्रँचमध्ये जाऊनही या सेवा सुरु करता येऊ शकतात.







Leave a Review