आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांना अभिवादन

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा उद्धोधक क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या 146 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

नगरसेविका व जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या उषा मुंढे व संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे यांनी पुष्पहार घालून व अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.

नगरसेविका मुंढे म्हणाल्या, बिरसा मुंडा यांनी जी क्रांती केली होती. याचा सर्व तरुणांनी प्रेरणा घ्यावी. त्यांच्या या धाडसी पराक्रमामुळे आज आम्ही सर्व प्रेरित आहोत.

त्याप्रसंगी नगरसेविका उषा मुंढे, संजय मराठे, कृष्णा भालचिम, सुदाम मराडे, प्रकाश कांबळे, निखिल जोशी, निलेश गायकवाड, संगीता ढिखळे, सुनिता कुवर, संगीता रावते, साक्षी टोणपे, फुलचंद शिंदे, प्रतीक उगले, महिंद्र बोकड आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.


Share this Newz