शिराळा गावात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची 146 वी जयंती उत्साहात साजरी

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, अमरावती : 

अमरावती येथील शिराळा गावात क्रांतिसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची 146 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

आदिवासी समाजाला उलगुलांन शब्द देणारे युवा पिढीत नवीन जोश भरणारे एकच नाव म्हणजे ते क्रांतिसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शिराळा गावामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

राजु झाकर्डे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाला संकेत चव्हाण, रोहित झाकर्डे, पवन सोळंके, किसनराव झाकर्डे, शुभम सोळंके, नितेश झाकर्डे, रामदास चव्हाण, योगेंद्र तायडे, प्रणव सिरसाट, अडमासी आदी उपस्थित होते.


Share this Newz