संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या शिवाजीनगर येथील संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी आपापल्या प्रशिक्षिकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

भारतीय जनमानसात गुरुपौर्णिमा हा दिवस विशेष महत्वाचा असून या दिवशी गुरु- शिष्य नातेसंबंध अधिक दृढ होण्यासाठी विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करीत असतात,अगदी शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन शिक्षण किंवा कौशल्य प्रशिक्षण घेत असतानादेखील विद्यार्थ्यांची ही आपल्या गुरुप्रतीची आस्था तितकीच एकसमान असते असे मत यावेळी यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले.

तर याप्रसंगी विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत केंद्र प्रमुख प्राची राऊत यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मीनाक्षी हिरेमठ, धनश्री चौधरी, स्वाती चोंधे व स्वाती घाडगे या प्रशिक्षिका उपस्थित होत्या.


Share this Newz