IIT JEE आणि NEET ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने वेदांतू या लाईव्ह ऑनलाइन लर्निंगमधील अग्रणी संस्थेच्या साह्याने आज एका नाविन्यपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहेयातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

खर्चअंतर आणि वेळ अशा शिक्षण घेण्यातील सर्वसाधारण अडचणी दूर करत या व्यासपीठावर टाटा स्काय जेईई प्रेप आणि टाटा स्काय नीट प्रेप या लिनिअर सेवा सादर करण्यात आल्या आहेतयात ९ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन पातळीची तयारी आणि ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जेईई मेनजेईई अँडव्हान्स आणि नीट या कोअर सिलॅबसची तयारी करण्यासाठी साह्य केले जाईल

दररोज ५ रुपये अशा परवडणाऱ्या दरात सर्वोत्कृष्ट वेदांतूच्या मास्टर टीचर्सकडून हा अभ्यास शिकवला जईलशिकवण्यातील सुयोग्य रेकॉर्ड असणाऱ्या आयआयटी आणि एम्सच्या शिक्षकांचाही यात समावेश आहेयात इंग्रजी आणि हिंदी अशा एकत्रित स्वरुपात शिकवले जाणार आहे . कंटेंट सहज उपलब्ध व्हावा यासाठी ही सेवा टाटा स्काय मोबाइल अँपवरही उपलब्ध करून देण्यात आली आहेइच्छुक विद्यार्थ्यांना बिंज पद्धतीने हवे तेव्हा शिकता येईल, तसेच बॅच  देखील रिपीट करता येणार आहे; सिलॅबस रिव्हिजन, परीक्षा, क्लास नोट असा सगळा कंटेट ऑनडिमांड उपलब्ध होईलविद्यार्थी इथे प्रश्नशंका विचारू शकतील आणि वेदांतूच्या तज्ज्ञ मास्टर्स टीचर्सकडून त्यांची उत्तरे मिळवू शकतीलया सेवेत उपलब्ध परीक्षा तयारीसाठीचे मटेरिअल ही अँपच्या माध्यमातून मिळवता येईल.

या भागीदारीमुळे टाटा स्कायच्या सबस्क्राईबर्सना वेदांतूच्या लाईव्ह लर्निंग प्रोग्राम्सवर खास डिस्काऊंट मिळणार आहेयात १२ वीसाठीच्या कोर्सेस सोबतच इतर स्पर्धा परीक्षासीबीएसई/आयसीएसई/राज्य बोर्ड आणि इतर अनेक विषयांचा समावेश आहे .सबस्क्राईबर्सना लाईव्ह क्लासेसअभ्यासक्रमकोर्स रिव्हिजन मटेरिअल इत्यादींचा अँकसेस या ऑफरमुळे मिळणार आहे. विद्यार्थ्यांना मजेशीर पद्धतीने आणि गुंतवून ठेवणारा शैक्षणिक अनुभव देतानाच या क्लासमध्ये इंटरअॅक्टिव्ह क्विझही असतीलविद्यार्थ्यांना टीव्ही रिमोटचा वापर करून ही उत्तरे देता येतीलस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या दोन सेवांमध्ये परीक्षांच्या तयारीसाठी फाऊंडेशन आणि कोअर लेसनवर भर दिला जाणार आहे.

जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात इयत्ता ९ वी आणि १० वी साठी ४४० हून अधिक व्हिडीओज तर ११ आणि १२ वी साठी २१०० हून अधिक व्हिडीओमधून हा अभ्यासक्रम उपलब्ध असेलतसेच जानेवारी २०२२ पासून सर्वसमावेशक रीव्हिजन सेशन्सही सुरू होतीलयात क्लास नोट्सतयारीसाठीचे मटेरिअल आणि टेस्ट सीरिजसह वेदांतूचे स्टडी सेंटर असेलहे सगळे टाटा स्काय मोबाइल अॅपच्या माध्यमातून उपलब्ध असेलटाटा स्काय जेईई प्रेप आणि टाटा स्काय नीट प्रेपमधून दरी भरून काढत सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५१८ वर टाटा स्काय नीट मिळवण्यासाठी ८८९१०८८९१० आणि ५१७ वर टाटा स्काय जेईई प्रेप मिळवण्यासाठी सबस्क्राईबर्सना ८४६००४८४६०४ या नंबर वर मिस्ड कॉल देता येईल.

टाटा स्कायच्या चीफ कमर्शिअल अँड कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, की देशभरातील सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता टीव्हीमध्ये आहेटीव्हीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण पुरवल्याने अधिकाधिक महत्त्वाकांक्षी व्यक्तींना फायदा होईलच पण त्याचबरोबर छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या ब्रॉडबँडच्या समस्येवरही तोडगा मिळेल.स्पर्धा परीक्षांसाठी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयारी करण्याची गरज असतेवेदांतूच्या साह्याने आम्ही विविध पार्श्वभूमी असलेल्याविविध क्षमता आणि शैक्षणिक प्राधान्य असलेल्या बहुविध लोकसंख्येला कोर्स मटेरिअलस्रोतदर्जेदार शिक्षक उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे दर्जेदार शिक्षण महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या अधिक समीप आणत आहोत.

वेदांतूचे सीओओ अरविंद सिंघल म्हणाले, की ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि परीक्षांची तयारी करणाऱ्यांना दरमहा वेदांतूच्या लाईव्ह लर्निंगचा फायदा मिळणार आहेआमचे उच्च प्रशिक्षित शिक्षक आणि खास तयार केलेला अभ्यासक्रम इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी टाटा स्कायसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहेप्रत्येक घरात परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याच्या आमच्या प्रवासात ही भागदारी म्हणजे एक पुढचे पाऊल आहे .


Share this Newz