प्रशांत शितोळे यांच्या सहकार्याने सांगवीत आठवडे बाजार चालू

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

महाराष्ट्र कृषी पणन महामंडळ, संत शिरोमणी श्री सावतामाळी अभियान, शेतकरी ते थेट ग्राहक विक्री अंतर्गत आठवडे बाजार, या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या सहकार्याने सांगवी येथे आठवडे बाजार चालू करण्यात आला असून, दर गुरुवारी पश्चिम भागात शितोळेनगर, तर दर मंगळवारी पूर्व भागात छावा चौक प्रियदर्शनी नगर येथे हा आठवडे बाजार भरणार असल्याचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व या आठवडे बाजाराचे उद्धघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेेळी बोलताना प्रशांत शितोळे यांनी सांगितले, की सांगवी येथील स्थानिक मंडईचा प्रश्न स्थानिक सत्ताधार्‍यांना सोडवता न आल्याने नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गैरसोय होत आहे. नागरिकांना भाजी मंडई नसल्याकारणाने विविध ठिकाणी भाजी खरेदी करण्यास जावे लागत आहे. त्यांचा प्रश्न लक्षात घेवून तसेच शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला, कडधान्य, फळे आदि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्थानिक भाजीपाला विक्रेते व फेरीवाले यांचाही प्रश्न सत्ताधार्‍यांनी मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या आठवडे बाजारामध्ये शेतीमधील ताजा सेंद्रिय भाजीपाला याचबरोबर गाईचे तूप, लोणी, पनीर, खवा, खरवस, विविध प्रकारचे लोणचे, विविध प्रकारचे पापड, विविध प्रकारच्या चटण्या, चिवड्यांचे विविध प्रकार एकाच ठिकाणी व योग्य दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या आठवडे बाजारास मिळत आहे.

यावेळी कुमार ढोरे, आबासाहेब ढमाले, शिवाजी पाडुळे, पंकज कांबळे, सुनिल ढोरे, उज्ज्वला ढोरे, पंकज कांबळे, प्रकाश ढोरे, रुपेश पुजारी, राधिका घोडके, शेखर शितोळे, गणेश शितोळे, धनंजय शितोळे, कोमल कवडे, सविता पोरे, चंपाबेन रमेशभाई गोहेल, कस्तुरबेन परमार, सुनीता मोहिते, कस्तुरा काची, जोत्स्ना चौहान, रिनल गोहेल आदि उपस्थित होते.


Share this Newz