ओडिसी इलेक्ट्रीकने लॉन्च केली नवीन कमी वेगवान स्कूटर

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

सध्या जगात ई-दळणवळण साधनांची रेलचेल सुरू आहे. दुचाकी निर्मितीमधील अग्रगण्य देश म्हणून भारताचा उदय झाला. ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्स ही देशातंर्गत इलेक्ट्रीक दुचाकी निर्मिती कंपनी असून त्यांनी भारतीय बाजारपेठेकरिता नवीन कमी वेगाची ई2गो स्कूटर लॉन्च केली.

लीड-अॅसिड आणि लिथियम आयोन बॅटरीज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या ई-स्कूटर रस्त्यावर पळण्यासाठी किफायतशीर आहेत, शिवाय त्यांच्याकरिता कोणत्याही नोंदणीची किंवा परवान्याची आवश्यकता नसते. या स्कूटरची शुभारंभाची किंमत देखील अतिशय कमी असून ती युवा वर्ग आणि महिलांसाठी उत्तम पर्याय ठरेल. ई2गो आणि ई2गो लाईटची अनुक्रमे किंमत रु 52,999 आणि रु 63,999 (एक्स-शोरूम अहमदाबाद) याप्रमाणे आहे. या उत्पादनांची मॉडेल्स 5 रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहेत.

ई2गोची निर्मिती ही शहरांतील महिला आणि युवा वर्गाला नजरेसमोर ठेवून करण्यात आली. या गटातील ग्राहकांना दळणवळणाची सूत्रे किफायतशीर किंमतीत स्वत:च्या हातात राखायला आवडते. त्याप्रमाणे या उत्पादनाकरिता कोणत्याही प्रकारची नोंदणी प्रक्रिया अथवा परवान्याची गरज नाही, असे ओडिसी  इलेक्ट्रीक वेहीकल्सचे चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर नेमीन वोरा यांनी सांगितले.

ओडिसी  ई2गो’मध्ये 250 वॅट, 60व्ही बीएलडीसी मोटर (वॉटरप्रूफ) इलेक्ट्रीक मोटर बसविण्यात आली आहे. या उत्पादनात 1.26 केडब्ल्यूएच लिथियम-आयोन बॅटरी किंवा 28 एएच लीड अॅसिड बॅटरी हे दोन बॅटरी पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांत अँटी-थेफ्ट मॅकेनिझमची सोय आहे. इलेक्ट्रीक स्कूटरचा सर्वोच्च वेग 25 केएमपीएच असून पूर्ण चार्ज झाल्यावर 60 किमीचे अंतर पार करू शकते. ज्याकरिता सुमारे 3.5 ते 4 तास लागतात. यामध्ये टेलेस्कोपिक फ्रंट फोर्क, ड्यूएल स्प्रिंग हायड्रोलिक रिअर शोक अॅबसोर्बबर देण्यात आले आहे.

नवीन ओडिसी  ई2गो इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रिवर्स गियर फंक्शन, 3 ड्राईव्ह मोड्स, एलईडी स्पीडोमीटर, अँटी-थेफ्ट मोटर लॉकिंग, कि-लेस एन्ट्री आणि युएसबी चार्जिंग दिलेले आहे. यामधील लिथियम बॅटऱ्या पोर्टेबल असून 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात. या बॅटऱ्या ओडिसी विक्रेत्यांकडे देखील सहज उपलब्ध असतील.


Share this Newz