The Newz Biz Team, Pune
पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मुर्ती दिनानिमित्त अलंकार पोलिस ठाण्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलिस चौकीमधील अधिकार्यांना व कर्मचारी यांना आरोग्यवर्धक मध व गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले.
वरिष्ठ पो. नि. सयाजी गवारे, त्यांचे सहकारी, माजी आमदार उल्हास पवार, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे, शहर सरचिटणीस भगवान कडू, शहर युवक अध्यक्ष विशाल मलके, उपाध्यक्ष आशिष व्यवाहरे, सौरभ आमराळे, ब्लॉक अध्यक्ष प्रताप शिळीमकर, अभिजीत रोकडे, राहुल लांडे, को. ब्लॉक महिला अध्यक्षा मनीषा करपे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्राजक्ता कलमानी, वैष्णवी किराड व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक पुणे शहर युवक काँग्रेसचे महासचिव विवेक कडू म्हणाले, की ह्या भ्याड हल्ल्यात आपल्या जवळच्या व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करताना दहशतवादाविरोधात युवकांनी आपला लढा अधिक तीव्र केला पाहिजे.











Leave a Review