नऊ महिन्याच्या चिमुकलीच्या हस्ते वृक्षारोपण

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

मुली या फुलाच्या कळीसमान असतात, या कळ्या कोमेजू न देण्याची भूमिका समाजाने निभावणे, ही काळाची गरज आहे. नवरात्रोत्सवात देशभरात देवींचे पूजन करून एकप्रकारे समाज स्त्रीत्वाला सलाम करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मुलींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पिंपळे गुरव येथे आदिलक्ष ग्रुपच्या वतीने अवनी या 9 महिन्याच्या चिमुकलीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन आदिती निकम यांनी केले होते. यावेळी अंकिता जाधव, सुनीता सुरळकर, अनिता राजोरीया, अवनी कुलकर्णी, मनीषा तेलुरे, नंदा सूळ, वैशाली कांबळे, विद्या कुलकर्णी आदी महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.


Share this Newz