The Newz Biz Team, मुंबई
टाटा मोटर्सने कमीत-कमी ईएमआयमध्ये कार घरी नेण्याची ऑफर देऊ केली आहे. यामध्ये ग्राहक फक्त ७९९ रुपयांच्या किमान हप्त्यात टाटा मोटर्सची कोणतीही कार खरेदी करू शकतात. या योजनेमुळे टाटा मोटर्सच्या भारत स्टेज-६ मध्ये सर्व कार, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) आणि इलेक्ट्रिकल वाहनांचा फायदा होईल.
टाटा मोटर्सने एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने ‘ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम’ आणि ‘टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम’ या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. एचडीएफसी बँकेबरोबर करार केला असून, या अंतर्गत टाटा मोटर्सने २ फायनान्स योजना आणल्या आहेत. एका योजनेंतर्गत ७९९ रुपयांच्या सुरुवातीच्या हप्त्यावर १ लाख रुपये कर्ज दिले जात आहे, तेथे लोकांना वर्षातून तीन वेळा किमान हप्ता भरण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे उत्सवाच्या काळात घरी नवी चारचाकी आणणे सहज शक्य होणार आहे.
एका निवेदनात टाटा मोटर्सने म्हटले आहे की, उत्सवाच्या हंगामात विक्री वाढविण्यासाठी आणि उत्पादनाला प्रवेश सुलभ करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने ‘ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम’ आणि ‘टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम’ या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे.
या योजनांमुळे ग्राहकांना कारचे हप्ते भरण्यास सुलभता येईल. त्याचबरोबर एक्स-शोरूम किंमतीच्या १०० टक्के लोन या फायनान्स योजनेंतर्गत घेतले जाऊ शकते. असे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे.









Leave a Review