सांगवी परिसरात रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात

आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मराठे करीत आहेत नियोजन
Share this Newz

The Newz Biz Team, Pune

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे यांच्या नियोजनातून नवी सांगवी भागात विविध ठिकाणी रक्ताचे नमुने घेण्यात आले.

या कामासाठी नवी सांगवीतील सामाजिक कार्यकर्ते शुभम चांद यांनी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना मदत केली. पीसीएमसी मधील SARS COV-2 IgG अँटीबॉडीच्या या सेरोप्रेलेन्स सर्व्हेसाठी क्लस्टर (क्षेत्रे) निवडली आहेत. प्रत्येक क्लस्टरमधून 25 (blood) रक्त नमुने (प्रत्येकी 5 मि.ली.) संकलित करुन डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जात आहेत. रक्ताच्या नमुन्यांसह, लोक आरोग्यशास्त्र, कोविड चाचणी आणि लक्षण इतिहासाशी संबंधित काही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेल्या स्वरूपात गोळा केली जात आहे.


Share this Newz