मॅजिकब्रिक्सतर्फे प्रॉपर्टी सेवा श्रेणीचा विस्तार, 13 कर्जपुरवठादार भागिदारांशी करार

Share this Newz

The Newz Biz Team, नॉयडा

आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी Property Services मार्केटप्लेस मॅजिकब्रिक्स प्रॉपर्टी साइटने आज Home Loans 13 आघाडीच्या कर्जपुरवठादारांसह सेवा क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. या नव्या विस्तारयोजनेअंतर्गत कंपनी घरखरेदीदारांना घर शोधण्यापासून व्यवहारांच्या टप्प्यापर्यंत सर्व प्रकारची मदत करणार आहे. घरखरेदीदारांना घर खरेदी करण्यासाठी मध्यम ते दीर्घ कालावधीचे गृह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मॅजिकब्रिक्सची अद्यावत योजना कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना कर्जाच्या उपलब्ध असलेल्या सर्व उत्तम ऑफर्स व दर यांची तुलना करण्यासाठी, अर्ज प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन व ऑफलाइन सहाय्य देण्यासाठी, तसेच थकबाकी हस्तांतर व स्थावर मालमत्तेवर कर्ज मिळवून देण्यासह गृह कर्जाची विस्तृत श्रेणी दिली जाणार आहे.

Magicbricks’ Home Loan प्लॅटफॉर्म 13 भागीदार बँकांचे सर्वोत्तम दर आणि योजना दर्शवणार असून त्यात एसबीआय, पीएनबी एचएफएल, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बरोडा, चोलामंडलम, हिरो फिनकॉर्प, सुंदरम होम फायनान्स लि., एल अँड टी हाउसिंग फायनान्स लि., आयआयएफएल, आयडीएफसी फर्स्ट, बजाज फिनसर्व्ह आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे.

या नव्या सेवेच्या लाँचविषयी मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले, आम्ही आमच्या सेवांचा  Property Services  नव्या योजनांच्या Home Loans मदतीने विस्तार करण्यास उत्सुक आहोत. या योजनेच्या माध्यमातून घर खरेदीदारांना त्यांच्या स्वप्नातल्या घरासाठी सर्वोत्तम कर्जाची माहिती करून घेण्यासाठी व ते उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याचा उद्देश आहे. ग्राहक वाजवीपणाला महत्त्व देत आहेत आणि अंदाजे 50 टक्के घर खरेदीदार आता रुपये 20 ते 50 लाख रुपयांच्या श्रेणीतील घरांना पसंती देत आहेत. सध्या व्याजदर सर्वात कमी असताना Home Loans आमची सेवा घर खरेदीदारांना ही गुंतागुंतीची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि बजेटची स्मार्ट हाताळणी करण्यासाठी मदत करेल. भविष्यातही आम्ही भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित सेवा क्षेत्रात सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारी कंपनी होण्याच्या आमच्या प्रवासात Property Services मार्केट प्लेसमध्ये नव्या सेवांचा समावेश करत राहू.

Home Loan सेवा ही मॅजिकब्रिक्सद्वारे पुढील काही आठवड्यांत लाँच केल्या जाणार असलेल्या स्मार्ट प्रॉपर्टी सेवांच्या विस्तृत यादीतील एक सेवा आहे. मॅजिकब्रिक्सच्या माध्यमातून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना ईएमआय गणतीसाठी कॅल्क्युलेटर्स वापरता येईल, पात्रता तपासता येईल, थकबाकी स्थलांतरित करता येईल. तसेच कर्ज प्रक्रियेचे बारकावे जाणून घेण्यासाठी एफएक्यू व इतर लेखांची मदत घेता येईल. कर्ज प्रकारासाठी उपलब्ध दर व ऑफर्स जाणून घेऊन त्यांची तुलना करता येईल, यात विविध ऑफर्स, पात्रता निकष आणि अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच माहिती देणारी बरीच पेजेसही आहेत. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना डॅशबोर्डही उपलब्ध करून दिला जाणार असून, त्याच्या मदतीने त्यांना आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल.


Share this Newz