The Newz Biz Team, Mumbai
गेल्या 2 ऑक्टोबर 2020 रोजी सादर झालेल्या महिंद्रा अॅंड महिंद्रा या कंपनीच्या ‘ऑल-न्यू थार’ या ‘एसयूव्ही’साठी 15 हजारांहून अधिक ग्राहकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. महिंद्रा अॅंड महिंद्रा ही कंपनी 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील प्रमुख कंपनी आहे.
‘ऑल-न्यू थार’ खरेदी करणाऱ्यांमध्ये 57 टक्के ग्राहक हे प्रथमच कार खरेदी करणारे आहेत. तसेच नोंदणी करणाऱ्यांमध्ये या वाहनाचे ऑटोमॅटीक मॉडेल घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे.
या यशाबद्दल बोलताना ‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’च्या ‘ऑटोमोटिव्ह डिव्हिजन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकरा म्हणाले, ‘ऑल-न्यू थार’ला मिळालेल्या या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही आनंदीत झालो आहोत. आतापर्यंत या गाडीने नोंदणीचा 15 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष बाब अशी, की ‘ऑल-न्यू थार’ला तिच्या नेहमीच्या चाहत्यांव्यतिरिक्त शहरी जीवनशैली असणाऱ्या ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे. हा मोठा प्रतिसाद पाहता, आम्ही आमच्या उत्पादनाची क्षमता वाढवीत आहोत.’
वाहन उद्योगामध्ये सर्वात जास्त प्रतीक्षा असणाऱ्या ‘ऑल-न्यू थार’बाबत ग्राहकांबरोबरच तज्ज्ञांनाही मोठी उत्सुकता वाटू लागली आहे. 2 ऑक्टोबरला गाडी सादर झाल्यापासून तिच्याबाबत 65 हजार जणांनी आमच्याकडे चौकशा केल्या आहेत, तर तिची वेबसाईट 8 लाखाहून अधिक जणांनी पाहिली आहे.











Leave a Review