The Newz Biz Team, पुणे
पिंपळे गुरव येथे जागतिक पशु दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपळे गुरव येथे एक असे व्यक्ती आहेत जे प्राण्यांना ही वेळोवेळी मदत करीत असतात, ते म्हणजे उद्योजक विजूशेठ जगताप.
इसवी सन 1931 मध्ये फ्लोरेंस, इटली येथे आंतरराष्ट्रीय पशु संरक्षण संमेलनामध्ये 4 ऑक्टोबर जागतिक पशु दिवस म्हणून पाळण्यासाठी एक संकल्पना मंजूर करण्यात आली. तेव्हापासून जगामध्ये 4 ऑक्टोबर हा जागतिक पशु दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक पशु दिनाचा औचित्य साधून कोणी ना कोणी काही ना काही 4 ऑक्टोबरला कार्यक्रम घेत असतात.
पण पिंपळे गुरव येथे एक असे व्यक्ती आहेत जे प्राण्यांना ही वेळो वेळी मदत करीत असतात, ते म्हणजे उद्योजक विजूशेठ जगताप. पिंपळे गुरव सारख्या शहरी भागात राहतात, पण त्यांनी या मध्यवर्ती ठिकाणी एक सुसज्ज गोशाळा तयार केली आहे. त्याचबरोबर तेथे एक घोड्यांचा तबेलाही आहे. शेळ्या मेंढ्या व एक छोटे कुकुटपालन सुद्धा आहे. त्यांचे तेथील शिस्तबद्ध नियोजन पाहिले असता, वाटते की शहरामध्येही ग्रामीण बाज आहे. त्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाते. खऱ्या अर्थाने जागतिक पशु दिन उद्योजक विजूशेठ जगताप रोजच साजरा करतात त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
उद्योजक विजूशेठ जगताप प्राण्यांची निगा राखतानाची काही छायाचित्रे ….















Leave a Review