शॅडो सिटीत व्हर्च्युअल माध्यमातून घरांना मागणी वाढली

हाऊसिंग डॉट कॉमचा निष्कर्ष
Share this Newz

The Newz Biz Team, पुणे

भारतात घरांसाठीची मागणी आजवर मुख्यतः सर्वात मोठ्या ८ शहरांमध्ये होतीपरंतु आता ही मागणी दुस-या आणि तिस-या क्रमांकांच्या शहरांमध्येही (शॅडो सिटी) जोर धरू लागली आहे. हा बदल देशभर चाललेल्या लॉकडाऊनच्या काळात अधिक स्पष्ट दिसत आहे, असे हौसिंग डॉटकॉम’ने म्हटले आहे.

अलीकडेच विकसित केलेल्या व्हर्च्युअल मागणी निर्देशांकानुसारइतकी वर्षे धीम्या गतीने वाढत असलेल्या मागणीत ऑगस्ट २०२० मध्ये एकदम मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात हा निर्देशांक महानगरांच्या १५० च्या पातळीच्या वर जात शॅडो सिटीसाठी २१० वर पोचला आहे. शॅडो सिटीज मध्ये गृहनिर्माणाची गती अगदी कमी होती. मात्र, या महामारीच्या रेट्यामुळे पायाभूत रचनेत अनेक बदल घडले आणि शॅडो सिटीजमध्ये घरांच्या मागणीने जोर धरलाअसे या विचारपत्रकात म्हटले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने घेतलेली गती आणि नव्या पिढीचे ग्राहक या शहरांत जमा होण्याची प्रक्रिया यामुळे तेथे फॅशन ब्रँडचे कपडेमहागड्या गाड्याअलंकार आणि घरे याबद्दल आकर्षण दिसत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अर्थव्यवस्थेला बसलेला फटका आणि रोजगाराबद्दलची अनिश्चितता यामुळे मोठ्या शहराकडून आपल्या गावाकडे असे उलट स्थलांतर सुरु झाले. असे परतलेले कर्मचारी बेरोजगार झाले आहेत किंवा आपल्या कामाच्या जागेपासून दूर राहूनच काम करीत आहेत.

या उलट स्थलांतरामुळे कामगार वर्ग आपल्या मूळ गावी परतला आणि छोट्या छोट्या गावांमध्ये ऑनलाइन खरेदीत वाढ झाली; तसेच ऑनलाइन पद्धतीने मालकीचे किंवा भाड्याचे घर शोधायला सुरुवात केलीअसे पत्रकात म्हटले आहे.

आमच्या हाऊसिंग डॉट कॉम   वर गेल्या काही महिन्यात महानगर श्रेणीत नसलेल्या अमृतसर, चंदीगडवडोदरा, नागपूरविजयवाडा आणि कोईमतूर या शहरांमध्ये घरांसाठी चौकशी करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे आढळले आहेअसे हाऊसिंग डॉटकॉम, मकान डॉट कॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉम या व्यवसायांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाल यांनी नमूद केले.  छोट्या शहरांमध्ये मागणी धीम्या गतीने वाढत आहे. मात्र, २०२० च्या पहिल्या सहामाहीत ही वाढ २७ टक्के होती. गेल्या वर्षी याच कालावधीत ही वाढ १९ टक्के होती. असेही ते म्हणाले.

आग्रा आणि अमृतसर मध्ये घरांसाठीची व्हर्च्युअल मागणी कोव्हिडच्या काळात दुप्पट झाली; तर वडोदरामंगळूरलुधियानाचंदीगड आणि लखनौमध्ये ही वाढ ८० टक्के होती. याउलट सर्वात मोठ्या ८ शहरात कोव्हिड कालावधीत मागणीतील वाढ त्याआधीच्या कालावधीच्या मानाने कमी दराने झाली.

मागणीतील या बदलांविषयी ज्येष्ठ व्यावसायिकांची मते:

ऑडी इंडियाचे प्रमुख अधिकारी बलबीर सिंग धिल्लों म्हणालेदुस-या आणि तिस-या क्रमांकांच्या शहरांमध्ये व्यवसाय वाढवण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे. या भागात लक्झरी मोटारींबद्दल आकर्षण वाढते आहे. आम्ही अशा ठिकाणी सर्वात आधी वर्कशॉप हे धोरण अवलंबून सेवा-दुरुस्तीची उपलब्धता या बाबतीत विश्वास निर्माण करतो. त्यानंतर शोरूम सुरु करतो. ठाणे, विजयवाडा आणि त्रिवेंद्रम येथे अशी वर्कशॉप सुरु करून आम्ही ग्राहकांच्या जवळ पोचलो आहोत. मागणीच्या स्वरूपानुसार आम्ही या प्रक्रियेला गती देऊ. याशिवाय इतर मोटारींबरोबरच ऑडी विकणा-या शोरूम ची संख्या दुप्पट करणार आहोत.

एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार तिवारी म्हणाले, भारतात सरासरी १०० पैकी फक्त ३ व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरतात. हे प्रमाण दुस-या तिस-या क्रमांकाच्या शहरांमध्ये याहूनही कमी असेल कारण येथे क्रेडिटवर खरेदीविषयी फारशी माहिती नसल्यामुळे तसेच पॉईंट ऑफ सेल्सचे जाळे आणि क्रेडिट वर केलेल्या खरेदीची वसुली करण्याची व्यवस्था नसल्यामुळे बँका या भागात क्रेडिट कार्ड या व्यवसायाबद्दल आजवर फार उत्सुक नव्हत्या. नोटबंदीसरकारचा डिजिटल व्यवहारांबद्दलचा आग्रह आणि इ कॉमर्स व्यवहारांमधील वाढ यामुळे हे चित्र बदलले आहे.  गेल्या तिमाहीत ग्रामीण आणि निमशहरी भागातील व्यवहारांचे प्रमाण दुस-या तिस-या क्रमांकाच्या शहरांमध्ये वाढले तर महानगरांमध्ये ते घटले असे क्रेडिट विषयक अभ्यास करणा-या संस्थांचे म्हणणे आहे. आमच्या कार्ड ग्राहकांपैकी जवळजवळ ४० टक्के दुस-या तिस-या क्रमांकाच्या शहरांमध्ये आहेत. नव्या ग्राहकांचे या भागांतील प्रमाण याहूनही जास्त आहे.  क्रेडिट कार्डवरील रक्कम चुकती करण्याच्या बाबतीत या भागांतील ग्राहकांची कामगिरी इतर शहरांच्या तुलनेत १०-१५ टक्के चांगली आहे. त्यामुळे या भागात बाजारहिस्सा  वाढविण्यावर एसबीआय कार्ड्सचा भर आहे.


Share this Newz