पोलीस आयुक्तांची विश्वकल्याण उपक्रमास अभ्यास भेट

Share this Newz

पुणे : पोलिसांच्या आरोग्यासाठी विश्वकल्याण उपक्रमाच्या संशोधनाचा अभ्यास व माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या उपक्रमास भेट दिली. यावेळी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, डॉ. व्ही. एम भुक्तर, गिरीश भारंबे, गणेश तनपुरे आदी उपस्थित होते.

पोलिसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, निकोप निरामय होण्यासाठी पोलिस आयुक्त प्रयत्नशील आहेत. विश्वकल्याण उपक्रम व जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेले वर्षभर जीवन शैलीचे विकार व संसर्गजन्य विकारमुक्त समाज यासाठी कार्यक्रम सुरु आहेत.

समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अलीकडेच अशोकराव काळे  व अनिल घनवट मुख्य संशोधक विश्वकल्याण उपक्रम यांनी पोलिस आयुक्त यांना भेटून पोलिस दलाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत संस्थेच्या वतीने “निरामय पोलिस दल” उपक्रम राबविण्याबाबत संयुक्त कार्यक्रम सादर केला होता.

पोलिसांना कामाचा प्रचंड ताण, अपुरे मनुष्यबळ, धावपळीचे जीवन, अवेळी आहार यामुळे विविध विकारांना सामोरे जावे लागते. साहाजिकच यामुळे  रोगप्रतिकारशक्ती कमी होते. या संदर्भात विश्वकल्याण ऊपक्रम पोलिस दलासाठी आरोग्यविषयक ऊपक्रम  राबविण्याकरीता प्रयत्न करत आहेत. योग, ध्यान, व्यायाम , पुरक आहार याद्वारे आरोग्यपुर्ण पोलिस दल या संकल्पनेच्या अभ्यासासाठी व उपक्रम समजावून घेण्यासाठी पोलिस आयुक्त यांनी विश्वकल्याण उपक्रमास भेट दिली.


Share this Newz