फक्त ‘या’ कांदा निर्यातीस केंद्राची परवानगी; नव्याने कांदा निर्यात बंदी कायम

Share this Newz

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बंदरावर अडकून पडलेल्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. देशातील सीमेवर आणि बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा निर्यातीच्या निर्बंधामुळे अडकून पडला होता.

कांद्याची निर्यात रोखल्यामुळे राज्यांमधील शेतकरी आक्रमक झाले होते. सर्व शेतकऱ्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांनी आदोलने केली. शेतकऱ्यांचा रोष पाहता वाणिज्य मंत्रालयाने अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र, नव्याने कांदा निर्यात बंदी कायम असल्याचे सांगितले आहे.


Share this Newz