पाखऱ्या ग्रुप तर्फे बैलपोळा उत्साहात साजरा

Share this Newz

पिंपरी :परिसरात बैलपोळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सांगवी गावातील पाखऱ्या ग्रुपचा बैल पोळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला व पारंपरिक पद्धतीने बैलांना सजविण्यात आले होते. यावेळी सोनवणे परिवाराने पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला.

यावेळी सांगवी गावचे ग्रामदैवत वेताळ महाराज मंदिर/ मारुती मंदिर/ महादेव मंदिर/ गजानन महाराज मंदिर येथे बैलांना दर्शनासाठी नेण्यात आले.

पाखऱ्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उत्सव साजरा करण्यात आला. बैलांना औक्षण करून पुरण पोळीचा नेवैद्य भरवण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ग्रामदैवताला साकडे घालण्यात आले. यावेळी गणेश तनपुरे, यश सोनवणे, सुरज कुंभार, ओंकार सोनवणे, किरण तरडे, रवी सोनवणे, तेजस चव्हाण आदी उपस्थित होते.


Share this Newz