Flipkart Big Saving Days सेलची सुरुवात

Share this Newz

नवी दिल्ली : Flipkart Big Saving Days सेल ची सुरुवात आजपासून (१८ सप्टेंबर) होत आहे. हा सेल तीन दिवस म्हणजे २० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये ई-कॉमर्स वेबसाईट्सवर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्स दिल्या जाणार आहेत. मोबाईल, टॅबलेट, टीव्ही, अॅक्सेसरी आणि अन्य  इलेक्ट्रॉनिक वस्तू या सेलमध्ये खरेदी करता येणार आहेत. 

फ्लिपकार्टने आतापर्यंत बिग सेविंग डेज सेलमध्ये उपलब्ध होणाऱ्या उत्पादनाचा खुलासा केला नाही. परंतु, मोबाईल आणि टॅबची माहिती दिली आहे. नो कॉस्ट ईएमआय, कार्डलेस, क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर सोबत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. टीव्ही आणि अप्लायन्स खरेदीसाठी इच्छूक ग्राहकांसाठी कंपनी नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स सोबत कंपलीट अप्लायन्स प्रोटेक्शन ऑफर करीत आहे.

बिग सेविंग डेज सेलमध्ये ३ कोटीहून जास्त इलेक्ट्रॉनिक आणि अॅक्सेसरीज ला विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. यावर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स मिळणार आहेत. अॅक्सेसरीज मध्ये फ्लिपकार्ट्स स्मार्टबॉय प्रोडक्ट्स यासारखे वायरलेस माउस, की बोर्ड्स, पॉवर बँक्स, हेडफोन, केबलवर आकर्षिक डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एसबीआय कार्ड युजर्संना क्रे़डिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे.


Share this Newz