The Newz Biz Team :
आपण नवीन फोन घेताना एक्सचेंजमध्ये आपला जुना फोन देऊन टाकतो. मात्र, या जुन्या फोनचं पुढे नेमके काय केले जाते, याबाबत आपण फारसा विचारच केलेला नसतो.
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या मोठ्या ई-कॉमर्स साईट्स अनेक सेल आयोजित करतात. त्यात ते एक्सचेंज ऑफर्स सुद्धा ठेवतात. जेव्हा एखादा मोबाईल खराब होतो, तेव्हा तो संपूर्ण निरुपयोगी होत नसतो. त्याचा एखादा अंतर्गत भाग हा निरुपयोगी झालेला असतो. जुन्या स्मार्टफोनमध्ये बरेच पुनर्वापरयोग्य घटक असतात आणि ते घटक अनेक प्रकारे वापरले जातात, काही जुन्या फोनमध्ये बहुतेक समस्या नसतात. त्या नूतनीकरण केल्या जातात आणि पुन्हा बाजारात विकल्या जातात. काही उपयोगात न येणारे फोन नफ्यासाठी किंवा त्यांच्या भागांना सुट्टे करून पुन्हा वापरले जाऊ शकतात.
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या कंपन्या त्यांच्याकडे जमा झालेले जुने स्मार्टफोन्स हे त्या-त्या स्मार्टफोन्सच्या मुळ कंपन्यांना विकतात. हे जुने स्मार्टफोन्स त्या कंपन्यांना पुढे नवीन स्मार्टफोन्स बनविताना उपयोगात येतात. तसेच कित्येकवेळा या स्मार्टफोन्स कंपन्या जुन्या स्मार्टफोन्सवर प्रक्रिया करून ते देशातील अनेक ऑफलाईन स्टोअर्समध्ये विक्रीस पाठवतात. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना हर्षद यांनी ही माहिती दिली.










Leave a Review