मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळून डोंगरावरील राडारोडा रस्त्यावर; वाहतूक धीम्या गतीने 

Share this Newz

पुणे, प्रतिनिधी : सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या मार्गावर स्लॅब कोसळल्याने डोंगरावरील राडारोडा खाली पडत आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्णपणे बंद नसली तरी धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
सुरक्षेचा उपाय म्हणून आज पहाटे 4 वाजल्यापासूनच या मार्गावरील वाहतूक तातडीने इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून वाहतूक बंद आहे. सध्या घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्ग वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने परिस्थितीवर सातत्याने बारीक लक्ष ठेवले जात आहे. रस्ता पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत प्रवाशांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईकडे जाताना उर्से टोल नाक्यावर सर्व वाहतूक रोखली. त्यामुळे प्रवाशांनी या मार्गावर येऊ नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Share this Newz