व्हेक्टर इन्फॉरमॅटिक इंडिया देणार गरिबांच्या कोविड -19 चाचणीसाठी  55 लाख

Share this Newz

पुणे, 

व्हेक्टर इंफॉरमॅटिक इंडियाने समाजापुढे आदर्श निर्माण करीत पुणे आणि मुंबईतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या कोविड -१९ चाचण्या करण्यासाठी देणगी म्हणून ५५ लाख रुपये खर्च करणार आहे.  

व्हेक्टर इंडिया ने यासाठी पुण्यात क्रस्ना डायग्नॉस्टिक्सचे सहकार्य घेतले असून, गरीब वस्त्यांमधील ठराविक ठिकाणी तपासण्या होणार आहेत. मुंबईत  व्हेक्टर इंफॉरमॅटिक इंडियाने बी ह्यूमन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करण्याचे ठरवले आहे. मुंबई महापालिकेने ठरवून दिलेल्या रुग्णालयांमध्ये या चाचण्या होतील. रुग्णांचे नमुने गोळा करण्यासाठी एक फिरते केंद्रही सुरु करण्यात आले असून, शहरातील गरीब वस्ती असलेल्या विविध भागात जाऊन हे वाहन मोठ्या संख्येने नमुने गोळा करेल.

         व्हेक्टर इंडिया व्यावसायिक निर्णय घेताना सामाजिक प्रश्नांचाही विचार करीत असते. याचाच एक भाग म्हणून सध्याच्या अभूतपूर्व स्थितीत पुणे आणि मुंबई शहरांमध्ये कंपनी काम करीत आहे. कारण या शहरांमध्ये अधिकाधिक चाचण्या होण्याची गरज आहे. त्यामुळे रोगाचे निदान लवकर होईल आणि रुग्णाला वैद्यकीय साह्य देऊन रोगाचा प्रसार रोखता येईल, असे व्हेक्टर इंफॉरमॅटिक इंडियाच्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्सचे प्रमुख पुष्कर सोनार यांनी सांगितले.

पुढील महिन्यात आम्ही हा उपक्रम बंगळुरू येथे सुरु करणार आहोत, असे व्हेक्टर इंफॉरमॅटिक इंडिया च्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख मुग्धा वर्तक म्हणाल्या.


Share this Newz