राज्यात पुढील निर्णय येईपर्यंत ई-पास आवश्यकच – गृहमंत्री देशमुख

Share this Newz

मुंबई :

केंद्र सरकारने ई-पासची अट रद्द केली असली, तरी महाराष्ट्रात मात्र आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक असणार आहे. महाराष्ट्रात पुढील निर्णय येईपर्यंत ई-पास आवश्यक असणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केले आहे.

देशभरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, आता केंद्राने ई-पासची अट रद्द केली आहे. यानंतर राज्यातील ई-पासही रद्द होईल अशी शक्यता होती. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. यानंतर गृहमंत्री अनिल देखमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. त्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत ई-पास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. बहुधा 1 सप्टेंबरपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

राज्यात अद्यापही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी पोलिसांच्या ई-पासचे बंधन कायम आहे. ई-पास रद्द करण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली. यानुसार आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासी व वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणत्याही परवान्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यानंतररही राज्यातील अटी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत.


Share this Newz