स्व. नानासाहेब शितोळे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिनेते वरूण भागवत यांच्या हस्ते होणार वृक्षवाटप

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 

सांगवीच्या विकासाचे शिल्पकार व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सोमवारी (दि. 18 जुलै) सकाळी 11 वाजता गणपती चौक, शितोळेनगर, जुनी सांगवी येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर माऊली फेम अभिनेते वरूण भागवत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव-शितोळे यांनी दिली.


Share this Newz