स्व. नानासाहेब शितोळे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त सांगवीत रक्तदान शिबिराचे आयोजन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 

सांगवीच्या विकासाचे शिल्पकार व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर रविवारी (दि. 17 जुलै) सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेत चंद्रसेन हॉल, शितोळेनगर, जुनी सांगवी येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त सांगवी गाव ग्रामस्थ व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती अतुल शितोळे यांनी दिली.


Share this Newz