पुण्यातील 7 वर्षाच्या मुलीने २० चारचाकी गाड्यांच्या खालून स्केटिंग करत रचला विश्वविक्रम

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :      पुण्यातील देशना आदित्य नाहर या अवघ्या सात वर्षांच्या मुलीने २० चारचाकी गाड्यांच्या खालून केवळ १३.७४ सेंकदात स्केटिंग करत अंतर पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. तिची गिनिज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या अतुलनीय कामगिरीबद्दल देशनाचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

या यशाला गवसणी घातल्यानंतर देशना व तिच्या कुटुंबाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. या भेटींसाठी विधान परिषद आमदार तसेच जिल्हाप्रमुख संभाजी नगर अंबादास दानवे, पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे (पाटील), मा. आमदार विलास लांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती श्री ऑल इंडिया श्वेताम्ंबर स्थानकवासी युवा जैन कॉन्फरेंस न्यू दिल्ली अंतर्गत (पंचम झोन) उपाध्यक्ष देवेंद्र पारख यांनी दिली.


Share this Newz