पत्रकार अतुल पवार यांची मायमर मेडिकल महाविद्यालयाच्या अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीवर निवड

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :    मावळ तालुक्यातील साप्ताहिक अंबर वृत्तपत्राचे उपसंपादक अतुल पवार यांची मायमर मेडिकल महाविद्यालयाच्या अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीवर निवड करण्यात आली. कमिटीच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती बेलसरे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र दिले. मायमर मेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, परिसरातील विविध संस्था पदाधिकारी यांसह सहकारी मित्र वर्गाने त्यांचे अभिनंदन केले.

गेली 16 वर्षे पत्रकारितेत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पत्रकार अतुल पवार येथील तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे संस्थापक सचिव असून, कार्यकारिणी सदस्यपदी काम पाहतात. सेवाधाम ट्रस्ट संचलित सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या कार्यकारिणी सहसचिवपदी ते आहेत. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचेही ते मानद सदस्य आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर वृत्तीने आणि मनमिळावू स्वभावाने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी संस्थांशी त्यांनी आपुलकीचे नाते जोपासले आहे. जनसंपर्क आणि मार्केटिंग यात त्यांचा विशेष हातखंड असून, श्री अ‍ॅडव्हर्टायझिंग या व्यावसायिक संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत.

 


Share this Newz