कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या मोफत अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमातील मोफत प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु झाले आहेत.

पुण्यातील यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या शिवाजीनगर येथील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग स्किल सेंटर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत बेकरी कोर्स व पारंपरिक पदार्थ कोर्स असे दोन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. तीन ते चार महिने कालावधीच्या या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, १८ ते ४५ वर्ष  वयोगटातील नागरिकांना यामध्ये सहभागी होता येईल.

बेकरी कोर्स प्रशिक्षणात ब्रेड, ब्रेडचे प्रकार, केक व केकचे प्रकार, खारी इत्यादी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर पारंपरिक पदार्थ कोर्समध्ये लाडू, लाडूचे प्रकार, चिवडा, शेव, बाकरवडी, गुलाबजाम, खवा पोळी व पुरणपोळी इत्यादी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार सुरु करण्याबाबतचे मार्गदर्शनही तज्ञांकडून देण्यात येईल, अशी माहिती यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी दिली.

या मोफत प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 7350014453 / 9158992299 /7350014536

अधिक माहितीसाठी संपर्क :

ज्ञानेश्वर  गोफण : 70 83474883

योगेश  रांगणेकर : 7350014536 / 9325509870


Share this Newz