रेंजहिल्समधील टाईप 3 कॉलनीतून दुचाकीसाठीचा रस्ता ऐन दिवाळीत अचानक बंद

रस्ता पूर्ववत सुरु करण्याची आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे पुणे जिल्हा चेअरमन रामभाऊ जाधव यांची मागणी
Share this Newz

पुणे, प्रतिनिधी : रेंजहिल्समधील टाईप 3 कॉलनीतून गेल्या पन्नास वर्षांपासून सुरु असलेला दुचाकीसाठीचा रस्ता ऐन दिवाळीत काही लोकांनी अचानक बंद केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्ता पूर्ववत सुरु करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे पुणे जिल्हा चेअरमन रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

            महत्त्वचे म्हणजे हा रस्ता गेल्या 50 वर्षा पूर्वीपासून चालू होता. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सोयीचा हा रस्ता होता. याच रस्त्यावर PRC म्हणजे अपंग सैनिक मुख्य केंद्र आहे. तेही जाण्या-येण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करीत होते. तसेच  AFK कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची बायका व मुले ये जा करत होते. भाजीपाला व मच्छी मार्केटमधून येण्यासाठीही हा महत्त्वचा रस्ता होता. तसेच मिलिटरी हॉस्पिटल जवळ असल्यामुळे मिलिटरी सेनिक व त्यांचे कुटुंबिय यांच्या दृष्टीनेही हा सोयीचा रस्ता होता.
          अतिशय महत्त्वचा रस्ता असूनही तो का बंद करण्यात आला, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
या परिसरात शाळा, कंपन्या, अपंग सैनिक केंद्र तसेच काली माता आणि आय्प्पा मंदिरही आहे. या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी हा महत्त्वचा रस्ता होता. मात्र,  ठेकेदाराला हाताशी धरून काही लोकांनी हा रस्ता बंद केला आहे. याचा सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित सुरु करण्यात यावा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
– रामभाऊ जाधव, पुणे जिल्हा चेअरमन, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ 

Share this Newz