आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी आदियाल परिवारातर्फे होमहवन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन दीर्घायुष्य लाभावे, यासाठी पिंपळे गुरव येथील भाजपचे युवा नेते अमरसिंग आदियाल व परिवारातर्फे गणेश मंदिरात होमहवन व आरती केली.

लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ते आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी अमरसिंग आदियाल यांनी होमहवन व आरती केली. यावेळी लक्ष्मणभाऊंवर प्रेम करणारे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.


Share this Newz