नगरसेवक संतोष कांबळे यांच्या तर्फे आयोजित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला तुफान प्रतिसाद ; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 
 आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक संतोष कांबळे यांच्यावतीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना माजी नगरसेवक शंकर जगताप यांची होती.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांना नगरसेवक संतोष कांबळे व मित्र परिवाराने पगडी व शाल देवून सन्मानित केले. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली परिसरात झालेल्या विकासकामांची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली.
कलाकारांनी आपल्या विनोदी अभिनयाने उपस्थित रसिकांना खळखळून हसवले. विनोदी कलाकार समीर चौघुले, वनिता खरात, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव यांनी विनोदाचे विविधढंगी धागे उलगडत सांगवीकर रसिकांना खळखळून हसवले. हिंदी मराठी चित्रपटातील गाणी, लावण्यांनी वातावरण अगदी भारावून टाकले होते.
आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, अश्विनी जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप, उद्योजक माऊली जगताप, नगरसेविका शारदा सोनवणे, माधवी राजापुरे, नगरसेवक हर्षल ढोरे, तुषार हिंगे, सागर अंघोळकर, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संजय जगताप, महेश जगताप, जवाहर ढोरे, संतोष ढोरे, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, आप्पा ठाकर, दत्ता येणपुरे, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, निमिष कांबळे, रविंद्र यादव, राहूल विधाटे, प्रविण कांबळे, विक्रम कदम, सुनिल कांबळे, अमित बाराथे, तसेच नगरसेवक संतोष कांबळे मित्र परिवार उपस्थित होते.

Share this Newz