द न्यूज बिज् टीम, पुणे :
लूप हेल्थ’ने मराठवाडा मित्र मंडळाच्या ‘आयएमईआरटी’ (इंस्टीट्युट ऑफ मनेजमेंट एज्युकेशन, रिसर्च अँड ट्रेनिंग) इंक्यूबेशन सेंटरबरोबर पुणे येथे सामंजस्य करार केला आहे. त्या माध्यमातून उभरत्या उद्योजकांना आरोग्यविमा पुरविला जाणार आहे. ‘लूप हेल्थ’च्या कटिबद्धतेचा भाग म्हणून हा सामंजस्य करार केला गेला असून त्या माध्यमातून युवा उद्योजकांच्या पुढील पिढीची काळजी त्याद्वारे घेतली जाणार आहे. स्टार्टअपना त्यांच्या प्रत्यक्ष उभारणीपर्यंतच्या विविध पातळ्यांवर आरोग्यनिगा उपलब्ध करून देत त्यांनी केवळ त्यांच्या व्यवसाय उभारणीवर लक्ष केंद्रित करावे यासाठी ही मदत केली जाणार आहे. ‘लूप हेल्थ’ ही स्टार्टअपना आपल्या समूह आरोग्य विमा पॉलीसीच्या माध्यमातून अमर्याद प्राथमिक निगा सेवा आणि वेलनेस फायदे मिळवून देणार आहे.
लूपने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्यनिगा फायद्यांमध्ये कर्मचारी, अपघात पॉलिसी, रुग्णालयात भारती असतानाचा खर्च, आधी व नंतरचा खर्च, बाळंतपणाचा खर्च यांचा समावेश आहे. त्याशिवाय अमर्याद ओपीडी सल्ल्यासाठी ‘लूप हेल्थ’ सदस्यत्त्व उपलब्ध असून प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक वैद्यकीय सल्लागार, योग व मानसिक आरोग्य सत्र तसेच लॅब व औषधांवर सूट हे फायदे त्यातून उपलब्ध होणार आहेत. सेंटर फॉर इंव्हेंशन, इंनोव्हेशन अँड इंक्यूबेशन (एमएमसीआयआयआय) हा पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजीज (टीटीएल), सायन्स अँड टेक्नोलोजी पार्क (एसटीपी) आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्यातील संयुक्त प्रकल्प आहे.
‘एमएमसीआयआयआय’ची स्थापना एक संपूर्ण स्टार्टअप परिसंस्था म्हणून झाली असून ही संस्था नवीन तंत्रज्ञान स्टार्टअपचा प्रसार आणि उद्योजकांना नवीन उत्पादने निर्माण करण्यासाठी बढावा देण्याचे काम करते. ‘एमएमसीआयआयआय’च्या सहअध्यायी रचनेमुळे एकत्रित काम करण्यास आणि योजनांना बढावा देण्यास प्रोत्साहन मिळते. त्याशिवाय नवीन स्टार्टअपना अर्थसहाय्य करत मदत केली जाते. ‘एमएमसीआयआयआय’च्या सहाय्यभूत संस्था आणि त्यांची नावाजलेल्या व्यावासायांप्रती असलेली बांधिलकी यामुळे ज्ञानाचे दानप्रदान होते आणि उद्योगातील जाळे अधिक घट्ट होते.
आयएमईआरटी संचालक डॉ जितेंद्र भंडारी म्हणाले की स्टार्टअप सपोर्ट योजनेचा भाग म्हणून आयएमईआरटी ही उभरत्या उद्योजकांना भक्कम पायाभूत सुविधा आणि सुरुवातीच्या काळातील सुविधा उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांना उध्यमाशिलता कौशल्य व आधुनिक गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत मिळविण्यासाठी ती एक परिसंस्था निर्माण करून देतो. लूप हेल्थ’बरोबर सहकार्य करार करून उभरत्या उद्योजकांना आणि स्टार्टअपना आरोग्य विमा उपलब्ध करून देत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.
लूप हेल्थ चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक काळे म्हणाले की भारतातील भावी उद्योजकांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयएमईआरटी’बरोबर सहकार्य करार करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. हे उद्योजक हे भविष्याचे देणे आहे. या संस्थापकांना अधिक उंची गाठण्यासाठी आणि जोखीम पत्करण्यासाठी सक्षम करणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चिंता न करता त्यांनी मार्गक्रमण करावे यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. ही भागीदारी म्हणजे स्टार्टअप परीसंस्थेमध्ये प्रभाव टाकण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे.











Leave a Review